अपर्णा भावे - माझ्यासमोरच गाल फुगवून, र...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्यासमोरच
गाल फुगवून, रागावून, फुरंगटून
निजलेला तो
तुझा वारसा चालवणारा...
जणू काही बालपणीचा तूच !
सगळं काही करून
अगदी असाच झोपायचास...पालथा
गालांवर वाळलेले, अस्पष्ट असे
अश्रूंचे ओघळ असायचे
तुझ्या गोबर्या गालांचा मग
मी पापा घ्यायची अलगद
तो पापाही तू रागारागानं पुसून
अगदी अस्फुटसा मुसमुसायचास
तुझं बालरूप समोर असूनही
त्याचा मात्र मी पापा घेत नाही
एकतर त्याची झोपमोड नको
दुसरं म्हणजे, त्यानंही माझा पापा पुसला तर ?
घाबरतं माझं हळवं झालेलं
प्रौढावलेलं मन...
‘ आजी ’ झालेय ना !
‘ आई ’चा कणखरपणा
नाही रे उरला आता माझ्यात !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP