सावित्री जगदाळे - अताशा काळीज कसं हलतच नाही...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अताशा काळीज कसं हलतच नाही
संवेदना होत चालल्यात बोथट
मन सुन्न, बधीर झालंय
भाव - भावनांचा होत चालला आहे खडक...
टोचणी - बोचणी - खंत - सल - भरून येणं
कशाचंच काही वातेनासं झालंय
किती घडतात घटना भोवताली
पण सगळंच
गाडलं जातंय कठीण कवचाखाली
काहीही मनात रुजेनासं झालंय
उलघाल - खदखद - तीळ तीळ तुटणं
काही उगवतच नाही दगडी मनावर
उदासीनतेचाही उठत नाही एखादा तरंग
किती दिवस राहावं जिवंत
कशाच्या बळावर राहावं जिवंत
आतल्या झर्यानं ?
कुठून वाहावं...
कसं वाहावं
नामोहरम झालेल्या वार्यानं ?
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP