प्रभाकर शाळिग्राम - देवळात या देवापाशी एकटाच ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
देवळात या देवापाशी
एकटाच मी गातो आहे
एकतारिवर भजन चालले
देव एकटा ऐकत आहे
एकटीच कोपर्यात समई
एकटीच ही वात जळे
अन् देवाच्या चरणावरती
एकटेच हे फ़ूल शिळे
एकटेच हे दगडी कासव
इथे चिरंतन विसावले
एकटेच हे छतास झुंबर
तेथे कबूतरही बसलेले
एकटीच ही जीर्ण पताका
कळ्सावरती फ़डफ़डते
एकटेच हे भ्रमिष्ट वारे
पाचोळ्यातुन भिरभिरते
एकटाच मी भक्तिपथावर
देव कदाचित दर्शन देइल
एकटीच मग माझी छाया
सदैव देवासोबत राहिल
खिन्न एकटे उदासपण हे
एथे-तिथे अन् अवतीभवती
अन् शरणागत माझे अश्रू
प्रभुच्या चरणांवर ओघळती !
N/A
References :
९५५२३३६२७५
Last Updated : November 11, 2016
TOP