एकनाथ आव्हाड - कुठूनी हा आला, गार गार वा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कुठूनी हा आला, गार गार वारा
सोबतीस आल्या, पावसाच्या धारा
थेंब टपोरे, झेलून घेऊ
पावसाचे गाणे, नाचत गाऊ
कडाडली वीज, नभ हे फुटले
मेघमल्हार ते, गातच सुटले
मोर नाचले, वनी अंगणी
थेंबाचे नूपुर, पायी पैंजणी
मातीला मिळाला, स्वतःचा गंध
पाने फुले देती, वार्य़ाला सुगंध
वारा हा ओला, धरतीही ओली
पावसात पाखरं, चिंबही झाली
पाऊस पिऊन, झाले ही नटली
हुशार होऊन, बहरत सुटली
चैतन्य सारे, दिसून आले
दान पावसाचे, धरतीस पावले
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP