अरुण म्हात्रे - जसे स्वप्न वळते तसा चालतो...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जसे स्वप्न वळते तसा चालतो मी
जिथे प्रेम म्हणते तिथे थांबतो मी
कशाला हव्या या दहा पायवाटा ?
घड्याळात काटे तसा चालतो मी
घराला कळे का कधी भिंत त्याची ?
जशी मानचिन्हे ताअ राहतो मी !
नदी दूर तेथे...तृषा आणि येथे...
तहानेस माझ्या मला पाजतो मी !
कळे नाश माझा असे ज्याच हाती
अशा गोड हाती मला सोडतो मी !
तुला जीवना घोर माझा कशाला ?
तुझ्या काळजीने मला जाळतो मी !
किती टाळले पण निघे दूर कोणी...
रिकाम्या नभाची हवा वाटतो मी !
मला धाक आहे सुगंधी क्षणांचा
अबोला फुलांचा असा साहतो मी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP