मंगला खंडागळे - सावळ्या रे मेघराजा तुझं ल...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सावळ्या रे मेघराजा
तुझं लोभस रुपडं
तुझी संथ बरसात
भरे मोद चोहीकडं
जणू धरतीचं बाळ
प्राशी धार चुटचुट
देतो तृप्तीचा आनंद
अभिषेक अखंडित
जणू वारीच निघाली
हाती घेऊन चिपळ्या
लागे दर्शनाची ओढ
पाने वाजवती टाळ्या !
राने हिरवी हिरवी
मने झाली चिंब चिंब
चिंब घरट्यात माय
देते पिलासाठी ऊब
थेंबाथेंबात दडली
तुझी प्रीत अनामिक
किती साठवून घ्यावा
असा थेंब एक एक !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP