ऋत्विक फाटक - किती तरी दिवस उलटून जातात...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
किती तरी दिवस उलटून जातात
तिचं जाणं खूप साहजिक असतं...
तिचं नसणंही मग अंगवळणी पडतं
आणि मग अचानक एखाद् दिवशी
पांघरायची शाल उचलताना
तिचा पूर्ण पिकलेला
पांढरा केस सापडतो
आणि मग वर्षानुवर्षांच्या सात्त्विक
खोबरेल तेलाचा वास असलेल्या
तिच्या पातळासारख्या मऊ मऊ
आठवणी खोलीभर पसरतात...
तिच्या सुरकुतलेल्या हातांवरून फिरवावा
तसा त्या शालीवरून हात फिरवून
मुटकुळं करून मी झोपतो...
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP