प्रमोद बेजकर - आंधळ्या या लोकशाहीला दळाव...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आंधळ्या या लोकशाहीला दळावे लागरे
भ्रष्ट श्वानांना जरासे पीठ द्यावे लागेते
एक आशेचा किरणही ना दिसे जेव्हा कुठे
काजव्याला सूर्य मनावे, पूजावे लागते
कारटे दुसर्या घरी अन् आपला बाब्या गुणी
प्रगतीपुस्तक लाल पण कौतुक करावे लागते
लोकशाहीची इयत्ता घसरली आहे अशी
गणित टक्क्याचेच आता सोडवावे लागते
मेंढरांची लोकशाही पर्वणी ही खाटकांना
आपसूक ती चालती, ना चालवावे लागते
बा, हुतात्म्यांनो कशाला रक्त सांडवले तुम्ही
पाहुनी फोटोत, शरमेने झुकावे लागते
देव झाल्याच्या भ्रमाने विसरले सारे कसे
राज्यकर्त्याला प्रथम माणूस व्हावे लागते
सांगता येते अम्हा, ना सहन जर झाले कधी
हुकुमशाहीच्या गुलामा, चूप बसावे लागते
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP