सुभद्राकुमारी चौहान - खूपच झाले अंत पाहणे आण वा...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
खूपच झाले अंत पाहणे
आण वागण्यामध्ये ओल तू
नसेल माझ्यावरी प्रेम पण
निदान माझ्यासवे बोल तू
छोट्या छोट्या गोष्टींवरुनी
असे सारखे काय रुसावे ?
सर्व चुका मज कबूल माझ्या
अता तरी तू छान हसावे !
मी तर आहे खाण चुकांची
आणि दयेचा तू तर सागर
प्रेम असो वा नसो मजवरी
सदा ठेव तू हसू मुखावर !
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP