अरुण सांगोळे - उगाच तारे मोजत बसतो काही ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
उगाच तारे मोजत बसतो काही कारण नसताना
रात्ररात्रभर जागत असतो काही कारण नसताना
निश्चित आहे हार तरीही सावकाश मी खेळ खेळतो
आयुष्याला हळूच पिसतो काही कारण नसताना !
जेव्हा जेव्हा माझा झालो...मनासारखे घडले नाही
आजकाल मी माझा नसतो काही कारण नसताना !
असे कोणते ठिकाण आहे जिथे कधी मी गेलो नाही ?
जिथे तिथे मी मलाच दिसतो काही कारण नसताना !
काय करू मी माझे आता... ? मलाच माझी कीव येतसे
उगाच रडतो, उगाच हसतो काही कारण नसताना
काय असे मी केले आहे ? कुणी न माझ्या येई जवळी
जो तो माझ्यावरती रुसतो काही कारण नसताना !
हजार वेळा असेल लिहिले नाव काळजावरी तुझे मी
पुन्हा पुन्हा मी लिहुनी पुसतो काही कारण नसताना
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP