सुनंदा पाटील - तो क्षण सगळ्यांच्या आयुष्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तो क्षण
सगळ्यांच्या आयुष्यात
कधीतरी नक्कीच येणार
हे माहीत असतं सगळ्यांनाच
पण काळ-वेळ नसते माहीत
त्या येणार्या क्षणाची
चिंता असते कुणाला
जाणारे क्षण मात्र
संपवत असतात प्रवास
सावकाऽश...
तो येताना-जाताना
देसत नाही कुणाला
ती वाट जाते मरणाच्या गावाला
आपल्या इच्छेविरूद्ध
हक्क गाजवणारा आहे
तो सूत्रधार
कळसूत्री बाहुली असतो
आपण त्यांच्या हातातलं
हंबरडा, किंकाळ्या, हुंदके
रोखू शकत नाही त्याला
यातलं काहीच
नतीही पडत्त अपुरी त्या क्षणी
त्या क्षणाला सामोरं जावं लागतं
अगदी एकटंच !
N/A
References : N/A
Last Updated : December 17, 2017
TOP