सर्वेश्वरदयाल सक्सेना - संकटं झाकोळून येत आहेत अस...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
संकटं झाकोळून येत आहेत
असं दिसताच
फैलावली जाऊन, तणावून उघडली जाते ती...
संकटं दूर होताच
पुन्हा आक्रसून घेते स्वतःला
अन् सैलावतेही
तिची तीच...
( संकटांच्या ) पावसापासून
तुम्ही बचावलात की
कोपर्यात टेकवून ठेवून द्या ती पुन्हा नीट...
प्रेम ही एक छत्री आही...
स्वतः ओली होते
आणि
वाचवते आपल्याला ( संकटांच्या ) पावसापासून !
N/A
References : N/A
Last Updated : July 26, 2016
TOP