मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
झुळझुळणार्‍या हवेचा पदर घ...

दिनेशकुमार शुक्ल - झुळझुळणार्‍या हवेचा पदर घ...

अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


झुळझुळणार्‍या हवेचा पदर घेऊन
कुठलीशी सुंदरता
लपत - छपत कुठंशी निघाली आहे...

वेगवेगळ्या रंगच्छदांचे
किरण चमकत आहेत...
की रंगांचेच बाण
कुणी हालकेच
सोडले आहेत तिच्यावर ?

पाणी जसं मेघरूपानं वर वर चढत जातं
आणि नंतर पुन्हा
- मनसोक्त बरसून
कुणाकुणाला तृप्त करत जातं
तशी तिची आकृतीही
धारण करत आहे वेगवेगळे आकार...

ती सुंदरताही
तशीच बरसत आहे
मनमुक्त
मात्र स्वतःतच...स्वतःच्या आतच !

तिच्या अंतरंगाचा गहनगूढ सागर
भरला जत आहे
ओतप्रोत...
दिवसेंदिवस
उसळत - फेसाळतही आहे...
आणि पुन्हा होत जात आहे अधिकच गहन

ती सुंदरता आता
दृष्टीत सामावून घेणं
होत चाललं आहे अवघड...क्षणोक्षणी

काहीतरी मिळवण्यासाठी
जेवढी बुडी घ्यावी लागत होती
सुरवातीला
त्या तुलनेत आता
दसपट तरी गहन
उतरावं लागत आहे
त्या सागरात...

सुंदरतेच्या सागरात !

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP