घाट माथा बरसणारा - अजूनी हवासा वाटतो रे गार ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अजूनी हवासा वाटतो रे
गार वारा झोंबणारा
वळणाच्या पाय घड्यावर
तुझ्या सवे हसणारा ॥धृ॥
हिरव्या गार पान फूलानी
दूर वाटा मोहरली
रंगाची फूलपाखरे ही
दिसता क्षणी बावरली ॥१॥
दूर वर घ्या वळणाची
अंतरात ही चाहूल
जपणारा तुझ्याच संगे
बरसणारा पाऊस ॥२॥
या इथे पलिकडे
खोल खोल वळणाची
घाटा संगे दरी उभारी
झेलणारी नागफणी ॥३॥
थिंबणारा ओघळ तो
गालावरती ओघळ हो
तुला पाहतो डोळ्या मधूनी
घाट माथा बरसणारा ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP