अनिरूद्ध अभ्यंकर - तुझी आठवण वाळूवरती गिरवाव...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझी आठवण वाळूवरती गिरवावी ?
नको जिवाला त्रास उगाचच...खोडावी !
बरेच झाले, मार्ग आपले दुरावले...
तू चाकोरी-वाट कशाला चालावी ?
कधीतरे येईल वाटते फ़ोन तुझा...
या आशेचर उभी जिंदगी काढावी !
तू आता नसतेस तिथे, ठाऊक मला...
तरी पावले दाराशी त्या थबकावी
रोज जागतो रात्र रात्र मी यासाठी...
पुन्हा जुनी ती स्वप्ने सगळी भेटावी
नलो व्यर्थ ही धडपड आता शब्दांची...
भाषा केवळ मौनाची तुज समजावी...
सत्य गोष्टीचा शेवट बदलावा...
सत्य जरी ही कथा; काल्पनिक वाटावी !
N/A
References :
९८५००००४३४
Last Updated : November 11, 2016
TOP