मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
बाईचं आयुष्य म्हणजे वही क...

मनीषा निपाणीकर - बाईचं आयुष्य म्हणजे वही क...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


बाईचं आयुष्य म्हणजे वही कोरी...
कसं लिहायचं ? का लिहायचं ?
कुणी लिहायचं ? केव्हा लिहायचं ?
हे सगळं नसलं तिला माहीत जरी...
जे लिहिलं जातंय ते ती सोशिकपणे सहन करते
धारदार शब्दासंगे कधी खरखरही करते !
वडिलांचं सगळं भावासाठीं ठेवते
नवर्‍याची जाहागिरी मुलांसाठी राखते
समंजसपणा, समजूतदारपआण
तिच्या फ्रंट पेजलाच असतो... !

नव्या - जुन्या आठवणींची असते मनी दाटी
कंटाळवाण्या पानावर सहज रेखाटते ती वेलबुट्टी
हे आयुष्य तिचंच असतं
पण लिहिणारा असतो दुसराच कुणी !
हे लिहिणारे असतात
कधी वडील
कधी भाऊ
कधी नवरा
तर कधी मुलं
म्हणूनच तर कदाचित
ती होत नसेल ना खिळखिळी ?

वरचं वेष्टन कितीही सुंदर असलं
तरी मधली मळकी पानं -
तिची चित्तरकथाच सांगत असतात
‘ तू लढ, तू लढ ’ म्हणणारे कधी कुठं सोबत असतात ?
तिला जरी वाटलं
हळूच घ्यावी भरारी
आपलीच माणसं पंख छाटतात !

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP