आरसी प्रसाद सिंह - चंद्र पाहाया हवी दृष्टी च...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
चंद्र पाहाया हवी दृष्टी चकोराची
वाढते गगनामुळे शोभा धरित्रीची !
मेघ नवतालावरी नर्तन करी
त्यावरी मल्हार आवर्तन करी
पाउलेही नाचती ठेक्यात मोराची
ज्योत ही दाहक जरी असली तरी
मात करते प्रेम दाहकतेवरी
साक्ष काढा झेप घेणार्या पतंगाची
वासनेला फक्त ठाउक हावरेपण
आणि प्रीती जाणते केवळ समर्पण
ठेव मरणातून लाभे अमरतेची !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP