चि. राम विरभद्र संकाये - माझ्या जीवनात सुखाला काही...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्या जीवनात सुखाला काही
वाव नाही.
तसे म्हणाल तर दुःखाला पण काही,
भाव नाही
आसवांच्या क्षणी स्मित मात्र हरवले.
मागे वळून पाहताना मला
दुःख देखील भारावले
म्हणे, ' असा कसा मनुष्य आहे
मला ( म्हणजे दुःखाला ) घाबरत नाहे
अन सुखाची आशाही करत नाही
अपयशाने मन कोलंडले व दुःख जरी मिळाले
तरी याची मला फिकीर नाही
कोणीतरी सांगितलेच आहे ना,
की प्रयत्नाशिवाय दुसरा पर्याय नाही.
दुःखाची हि वाट चालताना
कुणाचीही साथ नसते.
सुखाचे दर्शन घडताच
सर्वांची आपल्याकडे चाहूल असते
सुख - दुःख यांचा हा लपंडावाचा
न्याराच खेळ आहे
दोघांचा तर एका पाठोपाठ एक
चांगलाच मेळ आहे.
कधी दुःख गवसते
तर कधी सुख लपून बसते.
दुःख सुखाला शोधून कंटाळले
की सुख हळूच नजरेस भिडते
जीवनात माझ्या दुःखाला
पहिला नंबर आहे
कारण मला माहित आहे
दुःखानंतर सुखाचाच
नंबर आहे............
दुःखाला तर मी सदैव नमन करतोय,
कारण सुख तर फक्त माझीच वाट पाहतय
सुख तर....माझीच वाट पाहतय.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP