हेमंत दिवटे - कवितेच्या ओळींना चिकटलेला...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
कवितेच्या ओळींना
चिकटलेला असतो
आयुष्याचा कुठला तरी क्षण
आणि रिकाम्या जागांमध्येही
जसं खाल्लेल्या चिकन लॉलिपॉपला
चिकटून उरलेले असतातच
चिकनचे काही कण
तसंच जसं की
दोन शब्दांच्या दरम्यानही असतंच
कवितेचं ताजं, रशरशीत मांस
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP