रामदरश मिश्र - मी मागं ठेवून जाईन काही क...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मी मागं ठेवून जाईन
काही कविता, काही कथा, काही विचार
ज्यांच्यात असतील
प्रेमाची काही फुलं...
आणि असतील
काही तुमच्या - त्यांच्या व्यथा
काही तात्कालिक चिंता
मी गेल्यानंतर
यातलं काहीच माझं नसेल
मी कधी जाईन...
मी कुठं जाईन...
मी परतेन की नाही
मला काहीच ठाऊक नाही
आणि समजा मी परतलो तरी
या कविता, या कथा मला ओळखणार नाहीत
आणि मीही नाही ओळखणार त्यांना !
पण तुम्ही जेव्हा
आपुलकीनं, जिव्हाळ्यानं
या कवितांच्या, या कथांच्या
जवळ जाल
त्यांच्याशी गप्पागोष्टी कराल
तेव्हा तुम्हाला असं वाटेल
की
अरे, या कविता, या कथा तर
जणू काही आपल्याच आहेत...!
त्या तुमच्यात हळूहळू सामावून जातील
तुमच्याही नकळत
तुम्हाला भरून - भारून टाकतील
आतून - बाहेरून !
माझं काय...
निंदा असो स्तुति असो
टीका असो की गुणगान असो...
माझ्यापर्यंत यातलं काहीच पोचणार नाही !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP