प्रशांत मडपूवार - उरी आठवांचे रान तई रितीच ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
उरी आठवांचे रान
तई रितीच ओंजळ
अशी दाटते उदासी
आज कल्लोळ कल्लोळ
सांज एकटी एकटी
गहिवरुन आलेली
जशी सावली उन्हात
शांत अंधार झालेली
तरी आकांत मनात
आणि काळजात कळ
दूर क्षितिजापल्याड
झाले डोळयांच्या डोहांत
तुझ्या भासांचे बगळे
आणि मनाच्या तळाशी
असा पेटलेला जाळ
आता विझल्या शासांची
लय विस्कळित झाली
तुझ्या सुरेल गीतांची
याद मारव्यास आली
आणि मौनास मिळाले
सुने शब्दांचे आभाळ
अशी दाटते उदासी
आत कल्लोळ कल्लोळ
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP