डॉ. सयाजीराजे मोकाशी - वाट पाहत नभाची शेळ्या - म...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वाट पाहत नभाची
शेळ्या - मेंढ्या जीव सारे
येरे येरे म्हणूनीया
गाय वासरू हंबरे ।
अन्न ब्रम्ह कोमेजले
आता कसे जगायचे
भाकरीचे सदा पिसे
आता काय नेसायचे ।
गाय पाजेना वासरा
त्याने कुणाला लुचावे ?
काळ्या मातीचे मरणं
दुःख नभाला सांगावे ।
माती ढसढसा रडे
तिला लागली तहान
वेडी जित्या जीवासाठी
कशी पडली गहान ।
पाणी पाण्याकडे गेले
आता पडल्या रे भेगा
जन्मांतरी हा भोग
कसा जोडावा रे धागा ।
यास मिळाला मातीत
जीवा जीवांचे मरण
कष्ट गेले सारे वाया
आता रेचिले सरण ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP