सुभाष कवडे - महापूराच्या पाण्याने ठाण ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
महापूराच्या पाण्याने
ठाण आंगणी मांडले
शाळेच्या दप्तरालाही
आता कुठे कुठे न्यावे
पुन्हा पुन्हा महापूर
सुट्टी मिळते शाळेला
बुडलेला अभ्यासही
येतो तरी परीक्षेला
महापुराच्या पाण्याने
दिवस ही गढूळले
श्रावणानंद पळाला
भाळी गारठणे आले.
येतो कुठून आवाज,
'' पाणी आता वाढणार. ''
आई - बाबासंगे मन
रस्तो - रस्ती धावणार.
कृष्णाई आई आमुची
का गं अशी तूं कोपते
माझ्या शाळेच्या मैदानी
तूच का बरे खेळते ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP