समरेंद्र निंबाळकर - दु:खाचा ठणका ओला कधीच संप...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दु:खाचा ठणका ओला
कधीच संपला होता
ते शव जळाले माझे
तो उपचार अमानुष होता...
कळ्यांचा चुराडा माझ्या
जन्मात पसरला होता
शवात फ़ुलांनी माझा
पुन्हा देह सजवला होता...
मरण्यासाठी पुन्हा पुन्हा
मी जन्म वाहिला होता
आज जन्मास संपवताना
मृत्यूही हरला होता...
अवशेष स्मृतींचे माझ्या
बाळगणे नाही सोपे
शाश्वत नकार तुमचे
अन् हे बाईपणाचे ओझे...
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP