डॉ. संगीता बर्वे, - वार्याला चढला ताप पानांन...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
वार्याला चढला ताप
पानांना झाली काविळ
फांद्यांचे फ्रॅक्चर सोसुन
बुंधाही झाला जडशिळ...
हा डोंगर भक्कम इथला
पण दुखते त्याची दाढ
वर मानवतेचे चिन्ह
मिरवित झुलते झाड...
शहराच्या आकाशातिल
विझू लागले तारे
अन् डोळ्यांतील नभाच्या
अश्रूहि आटले सारे...
ही वखवखलेली नगरी
टाकते सारखी कात
लपवून सर्व काळोख
झगमगते इथली रात...
या धुरकट अवकाशातुन
किंचाळत उडती घारी
रक्ताला चटावलेल्या
डासांची चंगळ भारी
हे मेकप् केलेले हो
जरि शहर कितीही सुंदर
पण असा कसा हो झाला
शरिराला याच्या कॅन्सर...!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP