प्रकाश लावंड - माझ्या शेताच्या चतकोर तुक...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्या शेताच्या चतकोर तुकड्यात
मी सगळी पिकं घेऊन पाहिली
पण बाजाराच्या दगडी भिंतींवर
भरल्या गोण्या आदळत राहिल्या
उसवत गेल्या
सांडत गेल्या
आतबट्ट्याच ताळेबंद
मांडत गेल्या
आता माझ्या शेतात तण माजलंय
नैराश्याचं
हतबलतेचं
उद्वेगाचं
अपेक्षाभंगाचं
चीड,राग अन् संतापाचं
या तणाच्या वाढीला जबाबदार
असणार्यांनो,
मला एकच सांगा
आता हे तणाचे भारे मी कोठे टाकू?
तुमच्या हॉलमध्ये?
केबिनमध्ये?
की जिथं तुमच्या सभ्यतेची, नम्रतेची
शेंदरी पुटं गळून पडतात
या ऍंटीचेंबरमध्ये टाकू?
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP