मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
परवाच्या दिशी माही नात मल...

शंकर बडे - परवाच्या दिशी माही नात मल...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


परवाच्या दिशी माही नात मले म्हने:
‘ आबा, तुम्ही किती ओल्ड लॅंग्वेजमध्ये कविता लिहिता हो...! जरा इंग्लिशमध्ये ट्राय करा ना...’
म्या तिले म्हनलं:
‘ पोट्टे तुला असं वाट्टे का,
मले इंगरजी येत नाई म्हन ? एक डाव त्या गोर्‍या सायबासंगं
असा फ़ाडफ़ाड इंगरजीत बोल्लो
का त्यो गोरा जे गायब झाला तं त्याचा अजून तपास नाई !

पन तुले सांगू पोरी,
तुही इंग्लिश भाषा लयच तुसडी-तोडकी हाय गं
तिले नातेगोतेच नाई
काका असो, मावसा असो, मामा असो...
सारे अंकलच अंकल !

अगं, तिले कयलाच नाई
आत्याचा तोरा, जिव्हाया
आन् मामीची माया...
तिच्यासाठी सार्‍याजळी
आंटी, आंटी आन् आंटीच !

अगं, एकयी फ़ुटू नोये
तिले नात्याची फ़ांटी ?
अगं पोट्टे,
आमी पिढ्यान‌‌‌‌ पिढ्यान् पिढ्या
नात्यागोत्यावरंच तं जगलो वो
गनगोताचरंच तं तंगलो वो
तेच निसटलं तं
मंग जगावचं कायच्यासाठी ?

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP