विजय पुरव - बळी राजाची तू राणी तुझी ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
बळी राजाची तू राणी
तुझी करुण कहाणी
साताजन्माचा धनी
धनी टांगला ग रानी
हिरव्या रानाचं सपान
पाचोळ्याची वनराई
नसे कडब्याची काडी
गोठा हंबरल्या गाई
भाले उन्हाचे भेदते
अशी भेगाळली भुई
तापल्या देहाला
टोचती किरणांच्या सुई
दु:खाने आटला पान्हा
भिजे आसवांनी अंगाई
देते पिठाचं पाणी
तान्हा लेकराला आई
पुसे सौभाग्याचं कुंकू
दैवा तोकडी पुण्याई
पेटे दुष्काळाचा वणवा
अशी जळते ग बाई.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP