सौ. वंदना कुलकर्णी - स्त्री म्हणजे काय ? ती एक...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
स्त्री म्हणजे काय ?
ती एक देवता असते
स्त्री म्हणजे कोण ?
ती एक वात्सल्य मुर्ती असते ?
स्त्री म्हणजे कोण ?
ती एक वीणा असते
छेडली जरी तार
तालात लय असते
स्त्री म्हणजे काय ?
तारेवरची कसरत असते
घसरू नये पाय म्हणून
तोल नेहमी सावरत असते
स्त्री म्हणजे काय ?
फुलांसारखी कोमल असते
टोचले जरी काटे
वेदनांची शक्ती असते
स्त्री म्हणजे काय ?
तेवती ज्योत असते
मिटावा काळोख म्हणून
प्रखर धग सोसत असते
स्त्री म्हणजे काय ?
विश्वाची जननी असते
तिच्याविना जग अधुरे
सुखाची व्यापती असते.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP