रामचंद्र आवटे - माझ्या घरात आज मी आहे उद...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
माझ्या घरात
आज मी आहे
उद्या मी नसेन
माझ्या जागी
एक मिणमिणता दिवा असेल
दहा दिवसांनी तो दिवा विझेल
त्याजागी माझा एक फोटो असेल
लाकडी चौकट
कोरीव काम
हसरा फोटो...
काही दिवसांनी -
माझ्या लटकलेल्या फोटोवर
साचलेली धूळ असेल
किंवा त्या फोटोची पातळ काच
वेडीवाकडी तडकलेली असेल...
काही वर्षांनी -
माझा तो हसरा फोटो
भिंतीवरच्या छिद्रातून
खिळ्यासकट निखळलेला असेल
आणि मग त्यानंतर -
पिढ्यन्पिढ्या
मझ्याच घरात
माझ्या नावाचं
उरलेलं असेल फक्त एक छिद्र...
माझं रूपांतर
आता झालेलं असेल
एका स्मरणीय छिद्रात...एका स्मरणछिद्रात !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP