दीप्ती नवल - अनोळखी वाटांवरून चालू या ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अनोळखी वाटांवरून
चालू या पायी...चालत राहू या
काहीही न बोलता
आपापलं एकटेपण घेऊन
प्रश्नांच्या जंजाळातून बाहेर पडून
रीतीभातींच्या सीमांच्या पल्याड
आपण असेच एकमेकांबरोबर चालत राहू या
काहीही न बोलता
चल, दूरवर जाऊ या
तू तुझ्या गतकाळातली
कुठलीही गोष्ट काढू नकोस
आणि
विसरून गेलेली कुठलीही कविता
गुणगुणणार नाही मीही
तू कोण आहेस
मी काय आहे
या सगळ्या बाबी राहू देत बाजूला
चल, दूरवर जाऊ या
अनोळखी वाटांवरून
चालत राहू या ...
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP