अमृता खंडेराव - जंगलं किती छान असतात ती द...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जंगलं किती छान असतात
ती देतात निवारा पक्ष्यांना, माणसांना
जंगलाशी जोडलेली असते आपली नाळ
जन्माआधीपासून...अनादी कालापासून
खोल, घनदाट जंगलवाटांवरून
घुमत असते मानवाच्या अस्तित्वाचे चाहूल
तिथूनच सुरू झाला त्याचा प्रवास
आदिमानवापासून मानवतेपर्यंतचा...
एक झाड तोडणं म्हणजे
एका तान्हुल्याचा प्राणवायू नष्ट करणं !
एक झाड कापण म्हणजे
एका बाळाच्या फुफ्फुसात प्रदूषणाचं विष भरणं !
जंगल कापणं म्हणजे आपल्याच हातांनी
आपलं अस्तित्व संपवणं...
जंगलं कापणं म्हणजे
आपल्याच हातांनी आपल्या संस्कृतीचा गळा घोटणं
नका, नका माणसांनो,
जंगलं कापू नका...
माणूसपण हरवून पुन्हा ‘ जंगली ’ होऊ नका !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP