श्रीरंग विष्णू जोशी - तुम्ही ज्ञानदेवा समाधीस्थ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुम्ही ज्ञानदेवा समाधीस्थ होता
अम्हाला अगा पोरके वाटते
दिशा फ़ाटलेली, नदी आटलेली
आभाळासही एकटे वाटते
कुठे जाउ कैसे अम्हाला कळेना
उभे राहताना भुई हालते
अशी पाठमोरी किती राहशी तू
मनी काय मुक्ते तुझ्या दाटते ?
पुसावे कुणाला, कथावे कुणाला
नुरे पैसही भोवताली अता
समाधीस्थ समईवरी काजळीला
कळेना कसे झाडणे तत्वता
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP