दीपक बंड - तुझा हात धरून तुला पावलाव...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तुझा हात धरून
तुला पावलावर पाऊल टाकायला शिकवलं
एकेक पाऊल टाकताना
तु चालायला शिकलास
नव्हे, आता तू खूप धावायला लागलास
धावता धावता
तू एवढा पुढं गेलास की
मी आता खूप मागं पडलोय
आता तुझ्या परतण्याची
वाट पाहतोय
माझा हात
तुझ्या हातात द्यायचाय
चालायला लागले तेव्हा कळलं
स्वतःच्या पायावर
उभं सुद्धा रहावं लागतं
स्वतःच्या पायांवर उभा राहिले
तेव्हा कळलं
धावावं सुद्धा लागतं
मग स्वतःच्या पा्यांवर उभं राहून
धावायला लागलो
धावलो, धावलो, खूप धावलो
दमलो, थकलो, खाली बसलो
आता पुन्हा उभं राहण्यासाठी
कुणाचा तरी आधार हवाय....
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP