डॉ. सौ. जयश्री पाटील - पहाटेच्या गं येळला कोंब्ब...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पहाटेच्या गं येळला
कोंब्बड्याच्या गं बांगला
बंधु माझ गं चाचला
अन् मळ्याच्या वाटला.
सई बहीण मी त्याची
करी भाकरी न्याहरीला
पाटी घेऊन डोकीला
जाते मळ्याच्या वाटेला.
बंधु लागला कामाला
पान्हा आला गं हरणीला
सई बहीण मी जाते
दुध काढाया धारंला
चरवी भरून दुधाची
देती भावाला गं प्यायला
मनी म्हणती देवाला
औक्ष घाल रे भावाला
सुर्व्या आला माथ्यावर
ढोरं लागे हंबरायला
बंधु माझ गं उन्हाचा
जातो घेऊन पाण्याला
झुळझुळ वहातं पाणी
भाऊरायाच्या मोटला
पाटा पाटानं गं जातं
अन् उभ्या की पिकाला
भाऊ माझा ग राबतो
दिसभर शेतावर
सानं होऊन पिक आलं
माझं भरलं घरदार.
बंधु माझ गं लाडका
द्रुष्ट काढू याची कशी
ओवाळून गं टाकीन
सारी दुनव्या त्याच्यावरी.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP