सुनीता काटम - नदीचा काठ जरास रुसलाय कर्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
नदीचा काठ
जरास रुसलाय
कर्तव्य अन् प्रेम
या गर्तेत फ़सलाय
तिच्यावरील प्रेमापायी
आजवर तो उभा
प्रेम आहे पण,
त्याला नाही मुभा
नदी त्याला प्रेयसी वाटायची
रोज येऊन ती
त्यालाच तर भेटायची
आज त्याला कळलं
तो एक विसावा आहे
नदीला फ़क्त,
सागराचा धावा आहे
नदी सागराची हे
काठालाही मान्य
तिचं प्रेम पाहून
तो धन्य धन्य...
पण...
काठ नदी यांचा
सोबत चालण्यचा छंद
नकळत गुंतलेले हे
अनामिक बंध
याला नाव कय द्यावं ?
की काठानं सतत विचारतच राहावं...
‘ मी नदीचा कोण आहे ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP