डॉ. अनुजा जोशी - तो उतरतो आईचा हात घट्ट धर...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तो उतरतो आईचा हात घट्ट धरून
‘ स्पेशल स्कूल ’ च्या स्टॉपवर
मागं मागं वळून बघत राहतो
जात राहतो फरपटणार्या पायांबरोबर
आईनं घट्ट धरलेल्या हातांबरोबर
फोलपटागत पोकळ नजर
निरथकाचं हसं
आणि भिरभिरता अस्ताव्यस्त आनंद घेऊन
तो चालत राहतो शाळेची वाट आईबरोबर
पुन्हा पुन्हा बघतो सुटलेल्या बसकडं
सत्याकडेच्या कुत्र्याकडं
आईच्या पदराकडं
शर्टवर सांडणार्या लाळेकड्म
नि समोरच्या शाळेकडं बघत राहतो
त्याला लागता येत नाही
वेगवेगळ्या दिसणार्या या गोष्टीमध्ये एकसंगती
त्याला अडकवता येत नाहीत
या सुट्या सुट्या ठोकळ्यांच्या खाचा
एकमेकांत घट्ट
त्याला ओवता येत नाहीत
परिणामांचे मणी कृतीच्या दोर्यात
‘ स्पेशल स्कूल ’ च्या स्टॉपवर
उतरून जातो मुलगा
आईचा हात घट्ट धरून
नि मला लावता येत नाही त्याची संगती
माझ्या मेंदूत सुसंगत जुळलेल्या
एकाही पेशींबरोबर
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP