शीतल बारी - किती प्रेम केलं तुझ्या सा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
किती प्रेम केलं तुझ्या सावळ्या रूपावर...
सावळा विठू
सावळा राम
सावळा मेघश्याम
अभिषेकाच्या धारेसारखी
माझ्या प्रेमाची अखंड ओल
सावळाच होता अंतरीचा
प्रेमाचा डोह खोल...खोल
पण कुठलासा फिकुटला
रंग तू घेऊन आलास...
नि अनोळखी वाटसरूसारखा
नुसताच न्याहाळत राहिलास...
तू आलास...
भग्न देवळातून डोकावणार्या
उजाद शुभ्रतेसारखा...
अन् थांबलाही नाहीस, निघून गेलास
वाट चुकलेल्या पाखरासारखा
आता तरी करू नकोस
रंगाची अशी बेइमानी !
भरून जाऊ दे गाभारा तुझा
तुझ्याच कृष्णवर्ण मेघांनी...
गर्भार राहू देत ऋतू
काजळभरल्या दिशांनी...
अन् ओसंडू दे डोह पुन्हा
काठोकाठ भरुनी
काठोकाठ भरुनी !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP