शिवाजी सातपुते - ढेकणासारखी चिरडली जाताहेत...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ढेकणासारखी चिरडली जाताहेत माणसं
कणसासारखी
खुडली जाताहेत...।
अंध केली जाताहेत
बहिरी केली जाताहेत
धाक दाखवून धर्माचा
मुकीही केली जाताहेत माणसं
ऐकतच नसतील तर
ठरवली जाताहेत देशद्रोही...बेधडक !
बांधवांनो,
त्यांना काय करायचं ते करू द्या
हात तोडू द्या
पाय तोडू द्या
जीभही छाटू द्या
काय तोडफोड करायची ती करू द्या
पण आपण भारतीय असल्याचं ठणकावून सांगणारं
आपलं संविधान तेवढं
आपण वाचवू या
संविधान तेवढं जपू या !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP